👁 5 Views

पुणे – सोलापूर महामार्गावर ट्रक – जीपमध्ये अपघात

 

पुणे- सोलापूर महामार्गावरील पळसदेव काळेवाडी (ता. इंदापूर) येथे ट्रक व जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 4 जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (दि.


24) दुपारी 4 वाजेच्या सुमारास काळेवाडी येथे घडला यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग 65 वर पुणे-सोलापूर मार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणारा ट्रक 


(टीएन 52 एच 6611) यास पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या टाटा विंगर जीप (एमएच 14 सीडब्ल्यू 2217) ने उजव्या बाजूच्या पुढील चाकाजवळ जोराची धडक दिली.


या अपघातात जीपचालक सादाब पठाण (वय 24, रा. ढोकी उस्मानाबाद), नितीन गोरे (वय 23, रा. औरंगाबाद), सागर (वय 27, रा. भोसरी, पुणे) आणि राज पवार (वय 20, रा. सातारा)


 यांच्या डोक्याला, हाताला व पायास मार लागला. या सर्व जखमींना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


 याप्रसंगी डाळज महामार्ग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सांगळे यांच्यासह त्यांचे कर्मचारी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना बाहेर काढून वाहतूक सुरळीत करून दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *