👁 4 Views

कारमधील सव्वादोन लाखांची दारू जप्त

 

गोवानिर्मित विदेशी दारूचे ३० बॉक्स चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने माचणूरजवळ (सांगोला-मंगळवेढा रोड) पकडले. 


शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. 


मुंबई पासिंग असलेल्या एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचे बॉक्स नेले जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कदम यांच्या


 पथकाने शुक्रवारी (ता. २५) पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास माचणूर गावाच्या हद्दीत सापळा रचला. काहीवेळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला समोरून एक कार (एमएच ०२, सीएल ०८११) येताना दिसली.


त्याला अडवून पोलिसांनी वाहनचालक लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. कारसह पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 


ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम, सांगोल्याचे दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, जवान तानाजी काळे, तानाजी जाधव, वाहनचालक संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *