दोन दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाच्या एका महिला युट्यूबरचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलेला असताना मुंबईतील खार भागात आणखी एक अशीच घटना समोर आली आहे.
“मी सुरक्षा रक्षकाला बोलावण्याविषयी बोलल्यावर तो माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात आला आणि माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला.
तेव्हा मी घरात एकटीच होते. त्याने माझे हात पकडले आणि माझ्याशी गैरवर्तन करू लागला. मला खूप मोठा धक्का बसला आणि मी किचनमध्ये पळाले. किचनच्या खिडकीतून मी सुरक्षा रक्षकाला हाक मारली,” अशी माहिती पीडितेने दिली.
“सुरक्षा रक्षक आल्यानंतरही डिलिव्हरी बॉय ऐकण्यास तयार नव्हता. त्यानंतरही तो माझ्या दिशेने येत होता. अखेर सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले आणि त्याचा फोन घेऊन माझ्याकडे दिला. त्याच्या मोबाईलमध्ये माझा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ होता,” असंही पीडित महिलेने नमूद केलं.
पीडिता पुढे म्हणाली, “सुरक्षा रक्षकाने मला वाचवलं. सुरक्षा रक्षक नसता तर? मला माझ्या घरीही सुरक्षित वाटू नये का? या प्रकारानंतर मी कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कसा विश्वास ठेवावा? झेप्टो अशाप्रकारे ग्राहकांना सेवा देतं का? हा प्रकार पश्चिम खारमध्ये माझ्या घरात घडला. झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयमुळे किती लोकांना अशाप्रकारांना सामोरं जावं लागलं मला माहिती नाही. झेप्टोवरून ऑर्डर करणाऱ्या महिलांना कोणतीही सुरक्षा नाहीये.
पीडित महिलेने ट्विटरवर झेप्टोला आणि मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रार केली. त्यावर झेप्टोने झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार व्यक्त केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीत स्थानिक पोलिसांना सहकार्य करत असल्याचं सांगत तक्रारीत तथ्य आढळल्यास आरोपीवर कठोर कारवाई करू असं म्हटलं.





