सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता, एक वृद्ध व्यक्ती भरधाव रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. सायकल चालवताना हा व्यक्ती बिनधास्तपणे हात सोडून आणि भरधाव वेगाने सायकल चालवतोय. ज्या प्रकारे हा व्यक्ती सायकल चालवत आहे, ते पाहून असे वाटते की त्याचा अपघात होईल, मात्र तो यशस्वीपणे सायकल चालवतो. वृद्ध व्यक्तीचा हा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वृद्ध व्यक्तीचा हा स्टंट पाहून अनेक जण त्यांच्या हिम्मतीला दाद देतायत. तसेच अनेकांना त्याचा हा स्टंट पाहून बालपणाची आठवण झाली आहे.
दरम्यान ही घटना नेमक्या कोणत्या ठिकाणची याची माहिती मिळू शकली नाही.मात्र ही घटना याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने कॅमेरात कैद केली होती. त्यानंतर त्याचा व्हिड़िओ सोशल मीडियावर शेअर केली होता.
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.व्हिडिओवर खूप लोक कमेंट करत आहेत. एका यूझरने लिहिले की, आयुष्य सुंदर आहे. तर दुसर्या युझरने लिहिले की, सुपर, अशा भन्नाट प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत.





