👁 5 Views

तरूणाचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून

 

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये एका तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


घटना मिरजमधील  सांगलीकर मळा येथे घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


ऋषिकेश बाळासाहेब जाधव (वय 25, रा. घोरपडे वाडा, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश याचा मृतदेह सांगलीकर मळा येथील रिकाम्या जागेत आढळून आला. हल्लेखोरांनी ऋषिकेशचा धारदार हत्याराने निर्घृण खून करून चेहरा चेंदामेंदा केला आहे. ऋषिकेश याचा रात्रीच्या सुमारास खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बसवराज तेली 
पोलीस उपअधीक्षक अजित टिके  पोलीस निरीक्षक संजीव झाडे 
यांच्यासह श्वानपथक व पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मृत तरुणाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात
आल्याने पोलिसांनी कपड्यावरून नातेवाइकांचा शोध घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *