👁 5 Views

लगीन पडलं महागात , 10 लाखांच्या सोनसाखळीवर चोरांचा डल्ला

 

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील नौगावमध्ये एका महिलेकडून चेन स्नॅचिंगचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे. 


या व्हिडीओमध्ये चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तब्बल 10 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.


दरम्यान, ही संपूर्ण घटना जवळच्या दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

विवाह समारंभ आटोपून ही महिला आपल्या घराकडे पायी जात होती, मात्र त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ही घटना घडवून आणली. 


घटनेची माहिती मिळताच नौगाव पोलिसांनी  आजूबाजूच्या दुकानांमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *