Pandharpur: कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

Loading

Pandharpur: श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी शेळवे पंढरपूर येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंढरपूर मधील प्रसिद्ध  भूलतज्ञ डॉक्टर पंकज गायकवाड  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एक राष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देणारा आज 15 ऑगस्ट चा दिवस असून या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तन, मन, आणि धनाने बलिदान दिलेल्या शुर वीरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे असे सांगून त्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली. विविधतेने नटलेल्या भारत देशा मध्ये एकोप्याची भावना टिकवण्याचे  प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे सांगून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी  सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर,  कर्मयोगी इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग चे प्राचार्य डॉ. गुरूराज कुलकर्णी, कर्मयोगी विद्यानिकेतन महाविद्यालया चे प्राचार्या सौ.एम आर पाटील,  संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.  मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. एस एम लंबे, प्रा. अनिल बाबर, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. आर आर खिस्ते, प्रा. ए सी बाबर,  प्रा.आय जे कोरबू  प्रा. व्ही व्ही पालिमकर, प्रा. एस एन गायकवाड, प्रा. डि जे घनवजीर, प्रा. पी पी  कदम, प्रा. एस एस पंढरपूरकर तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *