👁 7 Views

प्रियकराबरोबर घरातील दागिने घेऊन तरुणी फरार, दागिने आणि पैसे मिळून तब्बल ५ लाख लंपास

 

प्रियकराबरोबर प्रियसी घरातील दागिने आणि दुकानातील रोख रक्कम घेऊन पळून गेल्याची घटना बालाजीनगर परिसरात घडली. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी वीस वर्षीय मुलगी आणि तिचा प्रियकर या विरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


अजिज मोहमंद शेख (वय २४ वर्षे, राहणार बालाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे बालाजीनगर येथे फोटो स्टुडिओ आहे. सोमवारी ते एका लग्न समारंभासाठी गेले असता, त्यांच्या पत्नी ने मुलगी बालाजीनगर परिसरात राहत असलेल्या तरुणाबरोबर निघून गेली असल्याचे सांगितले. 


दरम्यान तक्रारदार दुकानात आले असता दुकानातील रोख आणि घरातील दागिने असा तब्बल पाच लाख एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हे लक्षात आल्यानंतर तरुणीच्या वडीलांनी सहकारनगर पोलीस स्टेशन गाठले आणि मुलीसह तिच्या प्रियकराविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *