प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे.
प्रेयसीचीहत्या केल्यानंतर आरोपी तरुण थेट मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि तिथे त्याने हत्येची कबुली दिली.
संदीप अहिरे असे या प्रियकराचे नाव आहे. तर वैशाली मस्तूद असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.



