👁 6 Views

दोन ट्रकमध्ये चेपली कार; महिलाची जागीच मृत्यु

दोन ट्रकमध्ये कार चेपून दुर्घटनेत माजी जिल्हा परिषद सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटात घडली. यमुनाबाई रामचंद्र पवार (वय 68, चिंचोली लिंबाजी, ता.


कन्नड) असे अपघातात मृत्यू पावलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्यांचे नाव आहे. तर कारमधील अन्य तिघे कार चालक कृष्णा संदीप गव्हाणे (वय 66), अश्विनी कृष्णा गव्हाणे, गोरी कृष्णा गव्हाणे जखमी झाले आहेत. जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथे प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराणाचा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमासाठी कृष्णा गव्हाणे आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत शिवपुराण ऐकण्यासाठी जात होते. 


त्यांनी त्यांची बहिण यमुनाबाई पवार यांनाही सोबत घेतले होते. मात्र प्रवासादरम्यान कन्नडच्या औट्रम घाटात कारला अपघात झाला. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर औट्रम घाटाजवळ सरदार पाॅइंट येथे एक ट्रक अचानक थांबला. त्याच्या पाठिमागे गव्हाणे यांची कार होती. प्रसंगावधान साधून त्यांनी कार थांबवली मात्र त्याचवेळी पाठिमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या घटनेत कार पुढील ट्रकमध्ये घुसली. यात यमुनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *