👁 6 Views

दुचाकी अपघातात दोन ठार , एक जखमी

 

दुचाकीने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यांर्तगत येणार्‍या येरड ते दाभा रोडवर शनिवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान घडली.


लक्ष्मण नामदेवराव खंडाटे (70), विलास रामचंद्र हसतबांधे (50)अशी मृतकांची नावे असून सुरेश रामकृष्ण मरस्कोल्हे (30 वर्ष) हा जखमी आहे.


प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मण खंडाटे, विलास हसतबांधे व सुरेश मरस्कोल्हे सर्व रा. येरड असे तिघे एमएच 14 जेडब्ल्यू 1598 या क्रमांकाच्या दुचाकीने शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास येरड वरून दाभा येथे काही कामानिमित्य गेले होते. परत येत असतांना रात्री 11 वाजताच्या सुमारास येरड ते दाभा रोडवर देशमुख यांच्या शेताजवळील वळणावर त्यांची दुचाकी रस्त्याच्या खाली उतरून खड्ड्यामध्ये पडली. या अपघातात लक्ष्मण खंडाटे व विलास हसतबांधे यांचा मृत्यू झाला असून चालक सुरेश मरसकोल्हे हा जखमी झाला आहे.


ही माहिती गावातील नागरिकांना पहाटे 3 वाजता मिळाली असता त्यांनी ही माहिती तळेगाव दशासर पोलिसांना दिली. पहाटे 4.30 वाजता तळेगाव दशासर पोलिस स्टेशनचे ना.पो.काँ. सचिन गायधने, चालक पंकज शेंडे हे घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह विच्छेदनाकरिता चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविले. पुढील तपास ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात तळेगाव दशासर पोलिस करीत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *