👁 7 Views

तारीख ठरली, पण साखरपुड्याच्या आठवडाभरापूर्वीच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

 

औरंगाबाद जिल्ह्यातील  कन्नड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


कन्नड शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या प्रियंका बारकू वायडे (वय 23) या तरुणीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली.


 ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे लग्न निश्चित झाले असून, येत्या चार जानेवारीला तिचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. मात्र त्यापूर्वीचं तिने टोकाचे पाऊल उचलेले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, घरात आई-वडील नसताना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रियंकाने घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून मागील दरवाजाने घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाची कडी आतून लावून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. 


दुपारी प्रियंकाची आई मुलाला शाळेतून आणून घरी गेल्या असता दरवाजाला कुलूप दिसले. त्यांनी शेजाऱ्यांकडे मुलीने चावी ठेवली आहे का, अशी विचारणा केली. मात्र कुणाकडेही चावी ठेवलेली नव्हती. त्यानंतर त्यांनी पतीला फोन करून घराला बाहेरून कुलूप लावलेले असून, प्रियंका घरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते तात्काळ घरी आले. त्यानंतर खिडकीतून डोकावून पाहिले असता, किचनमधील पंख्याला प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *