एका विवाहीत महिलेने माजी नगरसेवकाच्या कुटुंबियांच्या विरोधात आणि तिच्या पतीच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. सिविल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल झाली आहे.
त्यामध्ये अनैसर्गिक संबंध आणि हुंड्यासाठी मारहाण केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हनीमूनच्या रात्री पीडीत महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवले आहेत. त्याचबरोबर सासू, सासरे आणि नणंद यांनी सुद्धा त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिलेने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या इन्स्पेक्टर पूनम कुमारी यांनी मीडियाला अधिक माहिती दिली आहे. महिलेने दिलेल्या माहितीवरुन पूनम कुमारी यांनी कुटुंबाविरुद्ध हुंडाबळीसाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक संबंध या आरोपावरुन गुन्हा दाखल केला आहे.
माझ्या कुटुंबियांवर लावण्यात आलेल्या आरोपात अजिबात तथ्य नाही. तक्रारदाराचे वडील फरिदाबादचे विद्यमान आमदार असून ते आमच्यावर दबाव आणत आहेत. आम्ही काही सुद्धा चुकीचं केलेलं नाही. त्याचबरोबर आम्ही हुंडा देखील आम्ही मागितलेला नाही. गरज वाटल्यास पोलिस आमची चौकशी करतील.
दोन्ही कुटुंबियांना समोरासमोर बोलावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबियांची समोरासमोर चौकशी करण्यात येईल. पतीच्या भावाने सुध्दा महिलेसोबत अव्यवहार केले आहेत. परंतु समाजामध्ये बदनामी नको,म्हणून महिलेने कोणत्याही गोष्टीचा खुलासा करत नसल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.



