👁 81 Views

चलो कोल्हापूर….! चलो कोल्हापूर…..! साखर कामगारांच्या अस्तित्वाची लढाई; ५ ऑक्टोबरला कोल्हापुरात इशारा मोर्चा

चलो कोल्हापूर….! चलो कोल्हापूर…..! साखर कामगारांच्या अस्तित्वाची लढाई; ५ ऑक्टोबरला कोल्हापुरात इशारा मोर्चा

महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीने सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ऐतिहासिक बिंदू चौक, कोल्हापूर येथे साखर कामगारांचा भव्य इशारा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम १९४७ अर्थात B.I.R. Act रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे साखर उद्योगातील सुमारे अडीच लाख कामगारांच्या कामगार हक्कांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर साखर कामगारांच्या अस्तित्वाची आणि भविष्यातील कामगार हक्कांची ही निर्णायक लढाई मानली जात आहे.

या मोर्चामध्ये प्रामुख्याने—

🔴 B.I.R. Act रद्द केलेला कायदा पूर्ववत करावा.
🔴 राज्यातील साखर कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे.
🔴 बंद व आजारी साखर कारखाने सुरू करून तेथील कामगारांचे पुनर्वसन करावे.
🔴 साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरत्या कामगारांना कारखान्याच्या सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी.
🔴 साखर कारखान्यांना उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात (MSP) वाढ मिळावी.

या प्रमुख मागण्यांसह साखर कामगारांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा इशारा मोर्चा काढण्यात येत आहे.

हा केवळ एका संघटनेचा मोर्चा नाही; हा महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या अस्तित्वाचा, हक्काचा आणि भविष्यातील सुरक्षिततेचा लढा आहे.

म्हणून महाराष्ट्रातील सर्व साखर कामगारांनी मोठ्या संख्येने ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

“साखर कामगार एकजुटीचा विजय असो!”

“साखर कामगारांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र एकवटला पाहिजे!”

राजेंद्र शिवाजीराव तावरे – पाटील.
सचिव – महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ.
मोबाईल नंबर – 9921200911

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *