👁 8 Views

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक उलटला, दोघेजण जागीच ठार

 

भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री औसा- तुळजापूर महामार्गावरील शिंदाळा (लो.) नजीक घडली.


याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भादा पोलिसांनी सांगितले, रायपूर (छत्तीसगड) येथून लोखंडी अँगल घेऊन कोल्हापूरकडे ट्रक (एचएच २६, बीई ९२११) हा गुरुवारी रात्री निघाला होता. भरधाव वेगात हा ट्रक होता. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने गुरुवारी रात्री १० ते १०.३० वा. च्या सुमारास शिंदाळा (लो.) नजीक असलेल्या पुलावर आदळला.


या अपघातात ट्रकमधील मनजोतसिंग बुटर (३२) व लवप्रितसिंग रंधावा (२५, दोघेही रा. अमृतसर) हे जागीच ठार झाले. हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक दिलबागसिंग होंदल हा पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच भादा पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास नवले यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोउपनि. प्रकाश शिंदे, सपोउपनि. महादेव गिरी, फिरोज शेख हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *