👁 169 Views

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने मोठी कारवाई; एकूण 1 लाख 42 हजार रुपयाची अवैध दारू व एक कार दोन मोटरसायकल असा एकूण 11 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने मोठी कारवाई;  एकूण 1 लाख 42 हजार रुपयाची अवैध दारू व एक कार दोन मोटरसायकल असा एकूण 11 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंंढरपूर (प्रतिनिधी) : सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलिसांनी छापा मारला असून एक होंडाई कंपनीची कार तिचा नंबर mh 13 इसी 6908 , एक युनिकॉन कंपनीची मोटरसायकल , एक स्कूटी असा तीन वाहनांमधून अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन जात असताना पंढरपूर शहर पोलिसांनी सापळा लावून एकूण 42 बॉक्स दारू त्यामध्ये देशी विदेशी कंपन्याची एकूण किंमत रुपये 1 लाख 42 हजार रुपयांचा अवैध दारू साठा व एक कार दोन मोटरसायकल असा एकूण 11 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर शहर पोलिसांनी जप्त केलेला असून सदर कारवाई मध्ये एकूण सात आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे , सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर , पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप , पोलीस हवालदार रोंगे , लोंढे , पोलीस हवालदार सुजित उबाळे, शहाजी मंडले, ठाकर , काझी , नवले, hc रंगे , महिला पोलीस राऊत , pc लोंढे भांडवड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *