👁 5 Views

वर्षभरापूर्वी लग्न , सासरचा जाच अन् पतीचं पत्नीसोबत भयानक कांड

 

जालना जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. एकाने थेट ट्रॅक्टर अंगावर घालून आपल्या पत्नीची हत्या केली


जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली. कविता गजानन आव्हाड, असे मृत पत्नीचे नाव आहे. तर गजानन रघुनाथ आढाव असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 ट्रॅक्टर अंगावर घालून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात घडली. कविता गजानन आव्हाड, असे मृत पत्नीचं नाव आहे. मृत महिलेचा वर्षभरापूर्वी आरोपी गजानन रघुनाथ आढाव याच्याशी विवाह झाला होता. मागच्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. याविषयी पती गजानन विरोधात हर्सुल पोलिसात तक्रार दाखल होती. त्यानंतर नातेवाईकांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत भांडणं मिटवून दोघांमध्ये समन्वय घडवून आणला होता. 

त्यानंतर पती गजानन तिला सासरी घेवून गेला. मात्र, चार-पाच दिवसांपूर्वी कविता हिची सासू कौशल्या रघुनाथ आढाव हिच्यासह घरातील मंडळींनी घर विकत घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये, यासाठी तिचा छळ करत होते.


 नंतर पती गजानन याने तिचा खून केला. तसेच नंतर ट्रॅक्टर अंगावर घालून अपघाताचा बनाव केला. याप्रकरणी मृत कविता हिच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन याच्याविरोधात हसनाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *