👁 4 Views

तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या , दोघांचा मृत्यु

 

शहापूर जवळील कुमार गार्डन हॉलजवळ मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.


अपघातात स्कूटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात  शहापूर तालुक्यातील कवडास येथे राहणारी अश्विनी गोळे ही युवती जागीच ठार झाली आहे. तर उपचार दरम्यान देखील एका महिलेचा मृत्यू झाला असून रिक्षामधील आणखी तीन जण जखमी असून त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे.


मुंबई-नाशिक महामार्गावर गंगा देवस्थान जवळील ब्रिजवर 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता. या थरारक अपघातात 2 जण जखमी झाले होते. आधी भरधाव कंटेनर पलटी झाला, त्याला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि मग आयशर टेंपो येऊनही धडकला होता. नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने एक कंटेनर जात होता. 

त्यावेळी चालकाचा ताबा सुटून कंटेनर साधारण 200 फूट अंतरावरुन घसरत आला आणि दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन ब्रीजच्या वर धडकून पलटला होता. त्यामुळे कंटेनरचे पुढील दोन्ही व्हील तुटून ब्रीजच्या मधोमध असलेल्या गॅपमधून खाली पडले होते. गंगा देवस्थान इथे रोज दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. 


मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी कुणीही ब्रीज खाली नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. कटेंनर ब्रीजच्या वर जाऊन इतक्या जोरात पलटी झाला की, ब्रीजला खालच्या बाजूने मोठा तडा गेला होता. त्यानंतर त्या कंटेंनरला पाठीमागून येऊन दुसऱ्या कंटेनरने येऊन धडक दिली होती. त्याच्या पाठीमागे जात असलेल्या तिसऱ्या आयशर टेंपोचीही धडक बसली होती. असा हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *