लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमची मानसिक आरोग्य व कल्याण सप्ताहाची सायकल रॅलीने सुरुवात.

लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमची मानसिक आरोग्य व कल्याण सप्ताहाची सायकल रॅलीने सुरुवात.

Loading

लायन्स इंटरनॅशनलने जागतिक स्तरावर मानसिक स्वास्थ्य या विषयावर सर्व लायन्स सदस्यांना कार्य करण्याविषयी उदयुक्त केले आहे. त्याला अनुसरून सर्व जगभरात ४ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत मानसिक स्वास्थ्याशी संबंधित विविध विषयावर उपक्रम घेतले जावेत असा हेतू आहे.


लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमने आपला नऊ दिवसांचा कार्यक्रम बनवून त्याची सुरुवात आज लायन्स क्लब पंढरपूरचे सदस्य व सायकलर्स क्लब पंढरपूर यांचे सदस्य यांनी संयुक्त रित्या रॅली काढून मोठ्या उत्साहात सुरुवात केली.


रॅलीची सुरुवात करण्यासाठी पंढरपूरचे पोलीस उप अधिक्षक मा. श्री. प्रशांतजी डगळे साहेब IPS हे उपस्थित होते. त्यांनी पंढरपूरातील हा सेवाभावी क्लब व सायकलर्स क्लब यांच्या या विधायक कार्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. व अशा कार्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आपल्यासोबत कायम असेल अशी ग्वाही देऊन पुढील सप्ताहास शुभेच्छा दिल्या.
रॅलीमध्ये प्रत्येकाच्या सायकलीना इंग्रजी वं मराठीमध्ये मानसिक स्वास्थ्यावर आधारित बोधवाक्ये व. स्लोगन लावले होते. घोषणा देत शिवाजी पुतळ्यापासून सावरकर पथ गांधी रोड वरून परत शिवाजी पुतळा अशी रॅली संपन्न झाली.


सायकलर्स संघटनेचे अध्यक्ष श्री.अभिजित कुलकर्णी, श्री. महेश भोसले सर, श्री. विठ्ठल पाटील सर, श्री. व्ही एम कुलकर्णी सर, श्री. संजय भाळवणकर, डॉ. रुचा सोनवणे, सौ. रेखा चंद्रराव, सतिश चंद्रराव सर व त्यांचे ५५ सहकारी रॅलीत सहभागी झाले होते.


लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमचे अध्यक्ष लायन डॉ.मंदार सोनवणे यांनी क्लबच्या मानसिक स्वास्थ्याविषयी कार्याची माहिती दिली. ला. ललिता कोळवले यांनी लायन्स इंटरनॅशनलच्या नऊ ग्लोबल कॉज विषयी माहिती दिली. लायन डॉ. शेरॉन भोपटकर यांनी मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे हे सांगितले. त्या स्वतः क्लब बरोबर करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.


लायन कृत्तांजली सावंत,लायन गणेश पाटील, लायन महेश सावंत इतर लायन्स सदस्य रॅलीमध्ये सहभागी झाले होते.रॅलीचे नियोजन प्रशासक ला. ललिता कोळवले व ला डॉ. मंदार सोनवणे यांनी केले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *