Pandharpur Live News Online: प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठ्याचं भगव वादळ मुंबईकडे घोंगावत आहे.
आझाद मैदानावर 5000 मराठा आंदोलकांना परवानगी पोलिसांनी दिली आहे. त्यावर आता जरांगे यांनी मोठी चाल खेळली आहे.
आंदोलन एका दिवसाचे होणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. तर मराठा आंदोलक इतर मैदानावर थांबतील. हे पाच हजार मराठा आंदोलक माघारी जातील, त्यांच्याऐवजी अजून 5000 हजार आंदोलक नव्याने येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारच्या अटी आणि शर्तींचे पालन होईल.
मुंबईंच्या वेशीवर मराठे असतील. आणि एक जत्था गेल्यानंतर दुसरा जत्था आझाद मैदानावर पोहचेल, अशी तजवीज होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी ध्वनीत केले. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार हे नक्की. त्यातच फडणवीस सरकार अटी आणि शर्ती मागे घेईल असा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटलांनी आंदोलनात दिलेली आश्वासने
- आंदोलनासाठी मिळालेली परवानगीची मूळ प्रत पोलीस अधिकाऱ्यांना दाखवली जाईल.
- पोलिसांशी नियमित संपर्कासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली जाईल.
- सभास्थळी पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील.
- धरणे आणि निदर्शने सुव्यवस्थित रीतीने होतील, वाहतुकीत अडथळा येणार नाही.
- सहभागी व्यक्तींची संख्या निश्चित मर्यादेत राहील.
- स्वयंसेवक तैनात केले जातील आणि त्यांची यादी पोलिसांना दिली जाईल.
- आंदोलन ठरवलेल्या ठिकाणीच होईल.
- आंदोलन सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच होईल.
- ध्वज/फलकाचे आकार आणि काठी निश्चित मर्यादेत राहतील.
- हिंसक किंवा धोकादायक साधने जवळ ठेवली जाणार नाहीत.
- कोणतीही चिथावणीखोर किंवा विभाजन करणारी भाषा वापरली जाणार नाही.
- पोलिसांनी दिलेले सर्व कायदेशीर निदेशांचे पालन केले जाईल.
- सार्वजनिक मालमत्ता किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला होणार नाही.
- कोणत्याही प्रार्थनास्थळाची किंवा पवित्र वस्तूची हानी होणार नाही.
- निर्दिष्ट ठिकाणावरून बाहेर जाणार नाही.
- कोणतीही कागदपत्रे, प्रतिमा किंवा अन्न जाळले जाणार नाहीत.
- परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक किंवा जनसंबोधन साधने वापरली जाणार नाहीत.
- कोणतीही वाहने, प्राणी किंवा वाहनसाधने आंदोलनस्थळी आणली जाणार नाहीत.
- आयोजकांनी अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
- हमीपत्रातील नियमांचे पालन पूर्ण केले जाईल आणि पोलिसांना सहकार्य केले जाईल.
मुंबईच्या आझाद मैदानात हळूहळू आंदोलन येण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानाकडे येत आहे. मोर्चामधील गर्दी आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडण्याची शक्यता आहे. आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकाकडून घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदानात दाखल होत आहे. विशेष म्हणजे या मोर्चात ओबीसी आणि मुस्लिम बांधवांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या या नियमाचे तंतोतंत पालन करत जरांगेंनी मोठी खेळी करत फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे, जरांगेंच्या या खेळीमुळे फडणवीस सरकाराची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा, सोलापुरातून २५ हजार वाहनांमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना
सोलापूर जिल्ह्यातून देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार केला आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
मुंबईकडे रवाना होणाऱ्या ताफ्यात हजारो वाहनांचाही समावेश आहे. जिल्हाभरातून जवळपास २५ हजार वाहने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यामध्ये मोटरसायकल, जीप, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप, ॲम्बुलन्स, पाण्याचे टँकर अशा विविध वाहनांचा समावेश आहे. तर काही जण सिद्धेश्वर एक्सप्रेस ने रवाना झाले आहेत.
मराठा समाजाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला असला तरी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा मराठा नेत्यांनी दिला आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यभरात मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरून आंदोलनं केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या या भव्य मेळाव्याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.