Pandharpur Live News : पंढरपूरात महसूल सप्ताहाचा शुभारंभ, पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय स्तरावरील उत्कृष्ट तहसिलदार पुरस्कार प्रदान

Pandharpur Live News : पंढरपूरात महसूल सप्ताहाचा शुभारंभ, पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय स्तरावरील उत्कृष्ट तहसिलदार पुरस्कार प्रदान

Loading

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण,लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण

पंढरपूर दि.(01):- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आज महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील महसूल कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचा वर्षभरातील कामगिरी बाबत उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आले. तसेच तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

यावेळी नायब तहसिलदार व्ही.व्ही. बुचके, उत्कृष्ट मंडळ अधिकारी आर.बी. वाघमारे, उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी डी. के. गावदंरे, उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी आर.बी. लोखंडे, उत्कृष्ट महसूल सहायक विजय झोरे, उत्कृष्ट शिपाई बी.एम. शिंदे, उत्कृष्ट महसूल सेवक, शिवा सलगर, उत्कृष्ट पोलीस पाटील, बालाजी माने यांना उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांना तहसिल कार्यालय या ठिकाणी बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडण्याबाबतची कार्यवाही करणेचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच पंढरपूर तालूक्यातील तहसिलदार व नगर भूमापन अधिकारी अशा प्रकरणांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 खालील प्रकरणांबाबत निर्णय घेऊन एकूण 22 आदेश पारित करून 7/12 दुरूस्ती करून संबंधित खातेदार यांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शासनाने तयार केलेले ई-हक्क पोर्टलवर सेतु सुविधा केंद्रामार्फत नोंदवून त्यानंतर तहसिलदारांकडे पाठविण्यात यावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

तहसिलदार सचिन लंगुटे यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान

राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम राबविल्याबद्दल पुणे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांचा विभागीय स्तरावर उत्कृष्ट तहसिलदार म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते सन्मान करणेत आला. तसेच सोलापूर जिल्यातील उत्कृष्ट खो खो खेळाडू म्हणून श्री. पंकज राठोड मंडळ अधिकारी कासेगाव तालुका पंढरपूर राष्ट्रीय व अनेक राज्य स्तरीय खो खो स्पर्धामध्ये विशेष प्राविण्य मिळवल्या बदल सन्मान यावेळी करण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *