Karmayogi : कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे” उद्घाटन, कर्मयोगी मध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

Karmayogi : कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे” उद्घाटन, कर्मयोगी मध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

Loading

Pandharpur : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी टेक प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन अचूकपणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतिपादन श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी केले. महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२५ च्या “सुविधा केंद्राचे” उद्घाटन प्रवेशासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते केले.


या बाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत बी टेक साठीची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. यासाठी कर्मयोगी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर म्हणून मान्यता ही मिळाली आहे याचा विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.


यावेळी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात म्हणाले सर्वप्रथम प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते यासाठीची मोफत सोय महाविद्यालयामध्ये केली आहे. महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, स्कॉलरशिप व इबीसी सवलत यासंबंधीचे संपूर्ण मार्गदशन मोफत केले जाणार आहे. तसेच अधिकच्या माहितीसाठी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात (9158325055) यांच्याशी संपर्क करुन विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करावी.


या सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, तसेच विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *