Pandharpur Live News:स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा ; प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती

Pandharpur Live News:स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा ; प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती

Loading

Pandharpur : (प्रतिनिधी)- स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व युटोपियन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड, मंगळवेढा येथे व दुपारी १. ३० वाजता श्रीयश पॅलेस कराड रोड पंढरपूर येथे सन्मान सोहळा व मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक पै दादासाहेब ओमणे यांनी दिली आहे.

सदर कार्यक्रमासाठी नामांकित वक्ते व सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्याते यशवंत गोसावी यांनी आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार संस्कारातून समाजशील आणि विवेकशील युवा पिढीच्या निर्मितीसाठी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रभर प्रबोधनाची आणि परिवर्तनाची मोठी क्रांतिकारक चळवळ निर्माण केली आहे.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी बी आर माळी, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग कादर शेख, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे तहसीलदार मदन जाधव, मुख्याधिकारी चरण कोल्हे, गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील सामाजिक, सांप्रदायिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या प्रतिष्ठानने अनेक कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने स्कूल बॅग, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी अशा स्वरूपामध्ये सन्मानित केले जाणार आहे.

तरी वरील मंगळवेढा कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वच शाळा कॉलेजचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *