👁 8 Views

सोलापूर: २० हजारांची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी जाळ्यात

 

सोलापूर दारूबंदीच्या दाखल गुन्ह्यात जामीनासाठी आरोपीला मदत करतो म्हणून तीस हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती वीस हजार रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.या प्रकाराने उत्पादन शुल्क विभागात खळबळ माजली.


आरोपी जवान नेमणूक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क – भरारी पथक मलंग गुलाब तांबोळी, याला अटक करण्यात आली आहे.सध्या उत्पादनशुल्क विभागाच्या भरारी पथकाद्वारे जिल्हात अवैद्य दारू विक्रीवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.


 अनेक ढाबा चालकांनी याचा धसका घेतला आहे.त्यात ही कारवाई झाल्याने उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.


यातील वर नमुद आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे विरुध्द राज्य उत्पादन शुल्क सोलापूर येथे दारुबंदी अधिनियम अन्वये दाखल असलेल्या गुन्हात तक्रारदार यांना जामीनाच्या अनुषंगाने केलेल्या सहकार्याचा मोबदला म्हणुन 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 20 हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *