Mangalvedha : मंगळवेढ्यात लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण

Mangalvedha : मंगळवेढ्यात  लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी ) : राज्यात सरपंच संतोष देशमुख प्रकरण गाजत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला गावातील गुंडांनी लाथाबुक्या आणि लोखंडी रॉडने मठातच अमानुषपणे मारहाण केली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मठात राहणारे राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी (वय 64 रा.सिध्दनकेरी) यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,मंजूनाथ सकलेश कोरे, भिमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे,संतोष रामचंद्र कोरे, सिध्दू येसाप्पा कोरे या सहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राचोटेश्वर स्वामीजी हे सिध्देनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षापासून राहत आहे. राचोटेश्वर स्वामी हे तोफकट्टी संस्थानमध्ये मठपती म्हणून धर्मोपदेशनाचे काम करीत आहेत. या मठातच सिद्धेश्वर मंदिर ही आहे. फिर्यादीच्या सोबत सेवेत त्यांची शिष्य काशिबाई रेवणसिद्धा स्वामी आणि शिवमुर्ती राचप्पा स्वामी हे नेहमी असतात. सिद्धनकेरी गावातील काही लोक पुजापाठ करण्याकरिता गेले असता ‘तो मठ आमचा आहे’ असे म्हणत त्यांच्यात आणि स्वामीजी यांच्यात वाद झाला.

यानंतर 3 मार्च रोजी रात्री 9 वाजता मठामध्ये खोलीत राचोटेश्वर स्वामीजी झोपण्याकरिता जात असताना आरोपींनी मठामधील सीसीटीव्हीची तोडफोड केली. त्यांनी ‘मठाचा मीच पुजारी आणि मालक आहे तू बाहेरुन आलेला असून तुझा इथं काहीही संबंध नाही. तू बाहेर ये’ असे म्हणून खोलीतून बाहेर ओढत आणून बेदम मारहाण केली.

यादरम्यान राचोटेश्वर स्वामीजी यांनी आरोपी राजू लिंगाप्पा कोरे मंजूनाथ सकलेश कोरे आणि त्यांच्या साथीदारांना ‘आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तुम्ही असे करु नका’ असे समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी न ऐकता मठातील लाईट बंद करुन स्वामीजींना लोखंडी गजाने पाठीवर,उजव्या खांद्यावर, दोन्ही मांड्यावर मारुन गंभीर जखमी केले. यानंतर राचोटेश्वर स्वामी यांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *