सोलापूर: कारने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास दयानंद महाविद्यालय चौकात हा अपघात घडला. करण धोंडीबा कवडे (वय १८, कोटा नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
किरण हा प्रियंका चौकातून दुचाकीवर (क्र. एम एच १३ डी एफ २११२) घराकडे निघाला होता. दयानंद महाविद्यालय चौकात कारने (क्र. एम एच १४ एच डब्ल्यु ३३४४) दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. यात किरण हा गंभीर जखमी झाल्याने मरण पावला.
याप्रकरणी किरण याचे वडील धोंडीबा नारायण कवडे (वय ५३, रा. कोटा नगर) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन कारचालक विवेक विजयकमुरा गिलडा ( वय ३१ रा. स्टेट बँक कॉलनी, भवानी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.