ढोरकीन: येथील एका तरुणाने घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १९) रात्री उघडकीस आली. वसीम जब्बार शेख (वय २२, रा. ढोरकीन) असे त्याचे नाव आहे. परिवारातील सदस्य घराच्या खालच्या मजल्यात होते.
वसीमने वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने कुटुंबीयांनी पाहणी केली तेव्हा हा प्रकार समोर आला.
त्याला बिडकीनच्या रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.