हिंगोली : घरात असलेल्या तरुणीवर नात्यातीलच तरुणाने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. किरकोळ वादामधून १९ वर्षीय तरुणीचा खून झाल्याचे समोर आले असून या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवत मारेकरीला ताब्यात घेतले आहे.
हिंगोलीच्या गोरेगाव भागात सदरची घटना घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. यात संजना गजानन खिल्लारी असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांच्या तपासात खून झालेली तरुणी हि स्वतःच्या घरात दुसऱ्या मजल्यावर होत. यावेळी आरोपीने अचानक पाठीमागून येत तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याचे पुढे आले आहे. तरुणीवर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.
पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना संशयिताला ताब्यात घेतले आहे. यात त्याची चौकशी केली असता खून झालेल्या तरुणीचा नातेवाईक तरुण आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. खुनाच्या या घटनेनंतर हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत या संपूर्ण खुनाच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत तपासाला सुरवात केली. दरम्यान गोरेगाव पोलिसांनी खून करून पसार झालेला संशयित आरोपी अभिषेक खील्लारी याला अटक केली आहे. मात्र तरुणीवर इतक्या क्रूर पद्धतीने आरोपीने हल्ला कोणत्या कारणातून केला याचं कारण अद्याप समोर आलेले नसून हिंगोली पोलीस याचा शोध घेत आहेत.