👁 6 Views

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या रात्रीच गळफास घेऊन संपवले जीवन……..

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या रात्रीच गळफास घेऊन संपवले जीवन……..

मिरज : शहरातील भारतनगर येथील बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १८, गवळी प्लॉट, भारतनगर, मिरज) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रथमेश हा एका खासगी अकॅडमीत बारावीमध्ये शिकण्यास होता. कालपासून बारावी परीक्षा सुरू होणार असल्याने सोमवारी सायंकाळी पेपर कसा सोडवायचा, याचे मार्गदर्शन त्याच्या अकॅडमीमध्ये करण्यात आले होत

ते मार्गदर्शन ऐकून रात्री आठच्या सुमारास तो घरी परत आला. घरी आल्यानंतर बहिणीसमवेत नेहमीच्या गप्पा झाल्यावर तो अभ्यासासाठी खोलीत गेला होता. त्यानंतर त्याने अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

रात्री पावणेनऊच्या सुमारास जेवायला बोलवण्यास गेल्यानंतर प्रथमेषने गळफास घेतल्याचे कुटुंबीयाच्या निदर्शनास आले. यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रथमेशचे वडील मिरज येथे कृषी विभागामध्ये सहायक म्हणून कार्यरत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *