यवतमाळ; पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साई मंदिर रोडवर दोन ऑटोंमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
सौरव भिका राठोड (वय १३, रा-दहिवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सौरव हा पुसद येथील श्रीराम असेगावकर विद्यालयात सातवीत शिकत होता. इतर विद्यार्थ्यांसोबत ऑटोमध्ये बसून पुसदला येत असताना विद्यार्थी नेणाऱ्या दोन ऑटोंमध्ये पुसद रोडवरील साई मंदिर परिसरात अपघात झाला. या भीषण अपघातात दोन्ही ऑटोतील विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातात सौरवचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पालकांसह नागरिकांनी एकच गर्दी केली होती. जखमींना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


