👁 5 Views

सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसुन दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू

सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसुन दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू

सोलापूर: सांगोला मिरज रस्त्यावर, सांगोल्याजवळ मालवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची सामोरा समोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला. तर अन्य नऊजण जखमी झाले.

फिक्कट गाडीतून डाळिंबाची वाहतूक केली जात होती. तर टेम्पोत ऊसतोड मजूर होते. सर्व मृत आणि जखमी सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील राहणारे आहेत.

बाबुराव महादेव गोडसे (वय ४२) आणि एकनाथ सोपान गडदे (वय ५३) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमी मध्ये विमल भारत कांबळे (वय ५५), रेश्मा संजय ऐवळे (वय ३०), सुजाता बापू आलदर (वय ३५), दामू राजाराम शिंगाडे (वय ६०), गोरख लिंगू सरगर, मोईनुद्दीन गुलाब मुलाणी (वय ७०) गणपत दत्तू आलदर (वय ५०), भारत विष्णू कांबळे (वय ६५) आणि हर्षद हणमंतु काटे (वय १८) यांचा समावेश आहे.

सांगोला तालुक्यातील कडलास येथील शेतकऱ्यांचा ऊस तोड करून जमेची १० के ६७५३) या टेम्पोमधून मिरज रस्त्यावर गौडवाडीकडे आपल्या गावी परत निघाले होते. तर एखतपूर येथून डाळिंब भरून एमएच ४५ एएफ ६७८५) पिकअप गाडी सांगोल्याच्या दिशेने निघाली होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. सांगोला पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *