👁 2 Views

येवती येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या ……..

येवती येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या ……..

अमरावती: मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येवती गावातील 65 वर्षीय वृद्धाने आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.4) उघडकीस आली आहे.

दयाराम दशरथ गाडे असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

याबाबत दयाराम यांचा मुलगा सचिन दयाराम गाडे (वय 33) याने माहिती दिली. त्यामध्ये त्याने सांगितले की, दयाराम गाडे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर अमरावतीच्या एका मानसोपचार विशेषज्ञाकडे उपचारही सुरू होते. यापूर्वीही त्यांनी एक-दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, घटनेच्या वेळी दयारामची पत्नी आणि मुलगा मजुरीच्या कामासाठी बाहेर गेले होते.

दयारामची सून प्रकृती स्थिर नसल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. अशात दयाराम घरी एकटे होते. त्यांनी घरी कोणी नसताना साडीचा फास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा घरचे लोक परत आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. याची तक्रार त्यांनी पोलिस पाटील संजय कावळे यांच्याकडे दिली. त्यांनतर मोर्शी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *