👁 4 Views

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर दिनांक 26 (जिमाका):- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 व्या समारंभ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.

       यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, अन्नधान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्य गीत गायन झाले. यावेळी तंबाखू विरोध तसेच कुष्ठरोग मुक्त भारत बाबत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व उपस्थित अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

*प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण-

 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या समारंभा निमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारती मध्ये अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.

 यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासह अन्य सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *