👁 12 Views

चिमुकल्याला फाशी देत आईने केली आत्महत्या

चिमुकल्याला फाशी देत आईने केली आत्महत्या

आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला फाशी देऊन त्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खांडवी येथे घडली आहे. साक्षी कुमार कांबळे, स्वरूप कांबळे अशी मयतांची नावे आहेत.

साक्षी आणि कुमार यांचा प्रेमविवाह झाला होता. दोनच दिवसांपूर्वी स्वरूपचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. साक्षीने शुक्रवारी राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने आपला मुलगा स्वरूप याला गळफास देऊन मारले. या घटनेमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *