👁 4 Views

पंढरपूर: श्री विठ्ठल दर्शन रांगेत भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू…….

पंढरपूर: श्री विठ्ठल दर्शन रांगेत भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू…….
Adult male with heart attack or heart burn condition, health and medicine concept

पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या एका वृद्ध भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास कासार घाटाजवळ घडली.

कृष्णा शंकरराव जाधव (वय ६४, रा. कोल्हापूर) असे मयत भाविकाचे नाव आहे.

कृष्णा जाधव आज आपल्या कुटुंबासह श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. पदस्पर्श दर्शनसाठी ते रांगेत उभारले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कासार घाटाजवळ रांगेत असताना कृष्णा जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले.

जवळच असलेल्या मंदिर कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

१५ जानेवारी रोजी पुणे येथील एका भाविकाचा दर्शन रांगेत उभे असतानाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आज कोल्हापूर येथील भाविकाचा मृत्यू झाला. आठवड्याभरात दोन घटना घडल्याने भाविकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *