👁 9 Views

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पती -पत्नी अन् दोन मुलांचा समावेश

 

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा भागात एकाच कुटुंबातील चौघानी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.


दरम्यान, या घटनेचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांनी जीवन संपवलं आहे.


 दीपक पुंडलिक थोटे (वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि समीक्षा दीपक थोटे (वय 16 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश.


शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *