👁 8 Views

बँक अधिकारी असल्याचे भासवून दोन लाखांचा गंडा

 

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी कार्ड स्वाईप केले. मात्र, पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे गुगलवर सर्च करून ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक घेतला.



येथेच त्यांची गफलत झाली अन् सायबर चोरट्याने त्यांना बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून दोन लाखांचा गंडा घातला.


 या प्रकरणी, विश्रांतवाडी येथील एका 55 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 15 नोव्हेंबर रोजी घडली आहे. फिर्यादींनी एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी कार्ड स्वाईप केले. मात्र, पैसे आले नाहीत. त्यांनी ऑनलाईन सर्च करून बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक घेतला. 


सायबर चोरट्यांनी बनावट ग्राहक सेवा केंद्र तयार करून आपला नंबर तेथे दिला होता. फिर्यादींनी फोन करताच त्याने आपण ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी ‘एनी डेस्क’ नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये काढून घेतले. फिर्यादीनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *