👁 6 Views

शेजारणीशी गप्पा मारणे पडले महागात, चोरटयांनी घरात डल्ला मारला

 

कोपरखैरणे येथे राहणारी एक महिला घराला कुलूप लाऊन शेजारच्या घरात गप्पा मारत बसली होती. हि संधी साधून तिच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५२ हजाराचे दागिने चोरी केले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


सेक्टर २ येथे राहणाऱ्या रुची सहानी यांच्या घरात हि चोरी झालेली आहे. शनिवारी रुची सहानी आणि त्यांचे पती नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेले. तर संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांची मुलगी मेहंदीच्या शिकवणीला निघून गेली.तर मुलगा हा खेळण्यास बाहेर गेला होता.


यावेळी त्यांची आई शेजाऱ्याकडे बसली होती त्यामुळे रुची यांच्या मुलीने घराला कुलूप लाऊन किल्ली आजीकडे देत शिकवणीला निघून गेली. जेव्हा शिकवणी संपवून रुची यांची मुलगी घरी आली त्यावेळी आजीकडून किल्ली घेऊन घराकडे गेली. मात्र घराचा कडी कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडलेला निदर्शनास आले. तसेच आतील सामान अस्ताव्यस्त होते. 


त्यामुळे चोरी झाल्याचे उघड झाले होते. संध्याकाळी पाच ते सहा या दरम्यान हि घटना घडली असून यात १० ग्रॅमचा ४० हजाराचा नेकलेस, ५ हजाराची २ ग्रॅम वजनाची अंगठी, आणि ७ हजार रुपयांचे ३ ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट असे एकूण ५२ हजाराची चोरी झाल्याचे लक्षात आले. या बाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *