👁 5 Views

पंढरपूर सिंहगडच्या कार्निव्हल मध्ये “गेट टू गेदर” चे प्रमोशन ,पंढरपूर सिंहगडचे कार्निव्हल २ के २३ उत्साहात संपन्न

 

पंढरपूर: प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणेसाठी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये आयोजित करण्यात आलेले कार्निव्हल २के२३ हे उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


  कोराना कालावधीनंतर प्रथमच सिंहगड कॉलेज मध्ये महाविद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फूड स्टाॅल, फनी गेम्स, ढोल पथक, वेषभूषा, व्यक्तीमत्व स्पर्धा, शेलापागोटे, संगीत खुर्ची, ग्रुप डान्स, वैयक्तिक गायन, वैयक्तिक डान्स वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर, लावणी, रीमिक्स गीतावर म्युझिक लावून विद्यार्थ्यांनी कला-कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


यावर्षी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजच्या कार्निव्हल २के२३ मध्ये पंढरपूर मधिल कलाकारांनी तयार केलेल्या “गेट टूगेदर” या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यादरम्यान वार्षिक स्नेहसंमेलनात गेट टू गेदर या चिञपटाचा ट्रेझर उपस्थितांना दाखविण्यात आला. 

 यामध्ये अ‍ॅक्टर एकनाथ गिते, ञिशा कमलाकर, इम्रान तांबोळी, डायरेक्टर सचिन धोञे, प्रोड्युसर समीर गोंजारी, रायटर प्रविण कुचेकर यांच्या सह रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे सचिव सचिन भिंगे, रो. किशोर सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. 


यादरम्यान कार्निव्हल २ के २३ यामधील विविध स्पर्धेतील स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सिंहगड कार्निव्हल मधुन प्रत्येक वर्षी मिस्टर व मिस सिंहगड यावर्षी दिशा शिनगारे व मिस्टर सिंहगड अनुकूल थोरात हे मिस्टर व मिस सिंहगडचे मानकरी ठरले.

दोन दिवशीय कार्निव्हल २ के२३ यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, कॅम्पस सुपरवायझर अविनाश वाघमारे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर महेश देशपांडे, अमोल नवले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *