👁 6 Views

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये १३ वे वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न


पंढरपूर: प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूर येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या (रंग- तरंग २०२३) पहिल्या दिवसाचा शुभारंभ गोवा राज्यातील डी.आय.ई.टी कॉलेज चे उप-प्राचार्य देवीदास कुदाव, सिंहगड संस्थेच्या शिक्षण संचालिका आशा बोकील, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले,  मुख्याध्यापिका स्मिता नायर, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवात सरस्वती वंदन करण्यात आले. 


  पहिल्या दिवशी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारीत प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे तबला वादन, गायन, ढोलकी, हार्मोनिअम, गिटार इत्यादी वादयातून संगीतमय नादातून देशभक्तीपर पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली तसेच इतिहास, शेती, संस्कृती , आरोग्य, खेळ, शिक्षण, विज्ञान आदी विषयावर स्कूल मधील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा अविष्कार घडविला.


  दुसर्‍या दिवशी सिंहगड संस्थेच्या शिक्षण संचालिका आशा बोकील यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. ‘चिल्लर पार्टी’ या संकल्पनेवर आधारीत वादन झाले. वाद्यांच्या गजरात संगीतमय सुरवात केली. 


या स्नेहसंमेलनाला

 पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *