👁 8 Views

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक सभा संपन्न

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 18  september  2017 

पंढरपूर: दि.१७- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयात रविवार, दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी बॅ. पी. जी. पाटील
सभागृहात माजी विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे
म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. श्री. वसंतराव देशमुख उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव होते. यावेळी श्री.
देशमुख यांनी, ‘आम्ही सर्व माजी विद्यार्थी व पालक आपल्या महाविद्यालयाच्या
नॅक पुनर्मूल्याकनांसाठी सर्वतोपरी सहाय्य व सहकार्य करू आणि पूर्वीपेक्षा चांगली
ग्रेड मिळविण्यासाठी मदत करू’, अशी भावना व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले. “समाजातल्या तळागाळातील वर्गापर्यंत ज्ञान
पोहोचविण्याचे काम आपले महाविद्यालय स्थापनेपासून करत आहे. ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय निर्माण करणारे हे महाविद्यालय आहे.
आज महाविद्यालयात, विद्यार्थ्याचा दर्जा उंचविण्यासाठी, अध्यापन व
अध्ययनासाठी नवीन प्रकारच्या तंत्रज्ञान व पध्दतीचा वापर, जागतिक दर्जाचे
संशोधन, विद्यार्थ्याच्या क्षमता वाढविण्यासाठी अभ्यासपूरक व अभ्यासेतर तसेच
पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रमही राबविले
जात आहेत. एक सर्वगुणसंपन्न माणूस घडविण्याचे काम आमचे महाविद्यालय करीत
आहे.”

यावेळी व्यासपीठावर एल. बी. पी. महाविद्यालय, सोलापूरचे प्राचार्य, डॉ.
डी. जे. साळुंखे, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव श्री. आर. डी. पवार, जनरल बॉडी
सदस्य मा. नानासाहेब लिगाडे, शहीद कुणालगीर गोसावीचे वडील मा. मुन्नागीर
गोसावी, मा. अनिल पवार, पालक प्रतिनिधी मा. आनंदराव खटकाळे, पुढारीचे
सहसंपादक मा. सिद्धार्थ ढवळे, सौ. संगीता पाटील, डॉ. एम. टी. बचुटे, श्रीमती
प्राजक्ता बेणारे, मा. घळसाशी सर, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे.
तोडकरी, वाणिज्य विभागाचे एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. जे.
एस. पाटील, सौ. डॉ. एफ. एस. बिजापुरे, डॉ. चांगदेव कांबळे, पत्रकार जैनुद्दीन
मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक सौ. डॉ. एफ. एस.
बिजापुरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. ए. बी. कांबळे यांनी केले. आभार
डॉ. चांगदेव कांबळे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर
सेवक, पालक, माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *