- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर : ‘आई- वडिलांनी व शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी मुलांनी
मनापासून ऐकाव्यात. प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक असावे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये
कोपर्डी सारख्या घटना घडतात हे दुर्दैव आहे. बलत्कार हा राजकारणाचा विषय
नाही, कोपर्डीची घटना लाजिरवाणी आहे. सामाजिक विषयाचे राजकारण होऊ
नये असे मला वाटते. स्त्रीयांच्या प्रश्नांबद्दल समाजाने संवेदनशील असावे. स्त्रियांचा
सन्मान राखावा. स्त्री अत्याचारा बद्दलच्या प्रश्नानाचे राजकारण करू नये.’ असे
प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबईच्या अध्यक्षा मा. खा. सुप्रिया सुळे
यांनी केले.

पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित नवमहाराष्ट्र युवा अभियान ‘जागर युवा संवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्त
त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव होते.
यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. एस. एम. पाटील, माजी
आमदार दीपक साळुंखे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.
जयमालाताई गायकवाड, जनरल बॉडी सदस्य मा. राजाबापू पाटील, मा. भगीरथ
भालके, पोलीस निरीक्षक मा. विठ्ठल दबडे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते
आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव
चव्हाण यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मा. शरद पवार यांनी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना मुबई येथे केली. चव्हाण साहेबांनी
भटक्य- विमुक्त, आदिवासी व महिला यांच्यासाठी अहोरात्र कार्य केले आहे. तोच
समाज कार्याचा वारसा आम्ही जपत आहोत. फुले, शाहू आंबेडकर या थोर पुरुषांनी
समाजात जगावं कस याचा मंत्र दिला असल्याचे ही खासदार सुळे यांनी सांगितले.
या प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी महाविद्यालयाच्या नियतकालिक पाहिल्यानंतर
एल.जी.बी.टी या विषयावर लेख वाचल्या नंतर हे महाविद्यालय मुबई सारख्या
मॅट्रो सिटीतील महाविद्यालया पेक्षा सरस असल्याचा उलेख करून ग्रामीण युवक
पुढे असल्याचे नमूद केले. त्या बरोबर प्राचार्य व संपादकांनी तो लेख प्रसिध्द केल्या
बद्दल कौतुक केले.
श्री. अभिजित पाटील कु. मेघारणी देवकर या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त
केली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सामाजिक प्रश्नावर त्यांनी समर्पक उत्तरे
दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्राचार्य, डॉ. जे. जी.
जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. पंढरपूर शहर व
परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पत्रकार बंधू यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची
शोभा वाढवली.


