👁 6 Views

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा संदिप मांडवे यांची वर्णी..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 22 september  2017 

पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे तरुण तडफदार शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचीच वर्णी लागली आहे. त्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीच्या माध्यमातून केलेल्या विविध कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून त्यांच्या कार्याची पोहोच पावती पुन्हा एकदा त्यांची निवड पंढरपूर शहराध्यक्षपदी करुन दिली गेली आहे.


राष्ट्रवादीचे नेते आदरणीत शरदचंद्रजी पवारसाहेन, अजितदादा पवार साहेब व आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या आशिर्वादाने व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. माझी पुन:श्‍च निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याची भावना संदीप मांडवे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केली.  


पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेेसच्या शहराध्यक्षपदी संदीप मांडवे यांची फेरनिवड करण्यात आली असून पंढरपूर शहरातील विविध प्रश्‍नाबाबात सातत्याने शहर राष्ट्रवादी कॉग्रेेसने आक्रमक भुमिका घेत केलेल्या कार्याची दखल घेत संदीप मांडवे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील,खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या आदेशानुसार त्यांना या निवडीचे पत्र सोलापूर येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर व जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांच्या हस्ते देण्यात आले.
              राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या माध्यमातून सद्या राज्यातील युवकांना संघटीत करुन विविध प्रश्‍नााबबत जनजागृती करण्यात येत आहे.त्याच बरोबर जनतेच्या प्रश्‍नासाठी सातत्याने कार्यरत राहणार्‍या युवकांना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या माध्यमातून आणखी बळ देण्यासाठी नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणुन सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादी युवक कॉगेेसच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात येत आहेत अशी माहीती यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी दिली.
    यानिवडीनंतर बोलताना शहराध्यक्ष संदीप मांडवे म्हणाले की,राज्यातील भाजपा-सेना युती शासनाबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शिवाय पर्याय नाही यात्री खात्री जनतेला  पटलेली आहे.आगामी विधानसभा निवडणूकीत याचा प्रत्यय येणार आहे.मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांचा व माझ्या सोबत हिरहिरीने काम करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचा तसेच मित्रपरिवाराचा आभारी आहे.आपणच शहराध्यक्ष आहोत याच भावनेने राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलेे.     

      यावेळी पंढरपूर शहर राष्ट्रवादीचे सागर कदम,नागेश गायकवाड,भास्कर जगताप,सुमित गायकवाड,विजय मोरे,निलेश कोरके,ॠषीकेश पवार,अजित जाधव,अविनाश मोरे,सतिश माने,गणेश थिटे आदी उपस्थित होते

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *