- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12 October 2017
पंढरपूर दि. 11- कार्तिकी यात्रा कालावधीत येणा-या भाविकांची गैरसोय होणार नाही.याची संबधीत विभागाने दक्षता घ्यावी.तसेच सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यात्रा व्यवस्थित व सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोख पार पाडावी असे आवाहन प्रांतधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी केले.
कार्तिकी एकादशी 31 ऑक्टोबर 2017 रोजी असून, कार्तिकीवारीत करावयाची कामे आणि नियोजन याबाबतचा आढावा प्रांताधिकारी यांच्या दालनात घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट,तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे,नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, नगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल जोशी यांच्या सह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
65 एकर येथे भाविकांसाठी , पिण्याच्या पाणी, शौचालय, विद्युत पुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबधित विभागाने योग्य नियोजन करावे. आरोग्य विभागाने यात्रा कालावधीत पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन ठेवण्याबरोबरच तज्ञ डॉक्टरांचे पथक व सुसज्य रुग्णवाहिका कार्यरत ठेवावे. एस टी महामंडाळाने जादा बसेसची व्यवस्था करावी. बसस्थानकावर भाविकांसाठी स्वच्छ व शुध्द पाणी आणि बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवावा.
यात्रा कालावधीत नगरपालिकेने शहर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासावेत. शहरातील अतिक्रमणे त्वरित काढावे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, अग्निशमन व्यवस्था तसेच यात्रा काळात स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. शौचालय व्यवस्था करावी. पोलीस विभागाने वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे तसेच दर्शन बारीत पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवावा. वीज वितरण विभागाने यात्रा कालावधीत सुरळीत व अखंडीत वीज पुरवठा करावा.
मंदिर समितीने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दर्शन मंडपात सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच, दर्शन रांगेसाठी बॅरेकेटींग व्यवस्था, सी.सी.टी.व्ही. यंत्रणा व आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरते उड्डाणपूल उभारावेत.
या बरोबरच सार्वजनिक बांधकाम, दूरसंचार, तहसिल, वीज वितरण, भीमा पाटंबधारे, राज्य उत्पादन शुल्क, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी या विभागाचाही बैठीकीत आढावा घेऊन संबंधिताना आवश्यक सूचना प्रांताधिकारी डॉ देशमुख यांनी या वेळी दिल्या.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


