👁 6 Views

मंगळवेढा: कारखान्यातील यार्डात ट्रॅक्टर चालकाचा मान अडकून मृत्यू

 

लवंगी येथील कारखान्यावर उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या बोनेट च्या पाईप मध्ये मान अडकून ट्रॅक्टर चालक उमेश दगडू भोरकडे वय 33 हा मयत झाला असल्याची पोलिसात नोंद झाली आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील खबर देणारे समाधान भोरकडे रा (यड्राव ता.मंगळवेढा) यांचा मयत भाऊ उमेश भोरखडे हा ज्ञानेश्वर मुकणे (रा बठान) यांच्या ट्रॅक्टरवर गेल्या तीन महिन्यापासून कामाला होता.


हा ट्रॅक्टर लवंगी येथील कारखान्यात ऊस वाहतुकीचे काम करीत होता सदर मयतास दारूचे व्यसन होते.

दि.19 रोजी उमेश हा दुपारी तीन वाजता कामावर गेला होता दि.20 रोजी सकाळी सातच्या दरम्यान ट्रॅक्टर मालकाचा भाऊ राजाराम मुकणे याने कळवले की


लवंगी कारखान्याच्या यार्डात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे डावे बाजूचे मागील चाकाच्या जवळ टपाचे बोनेटच्या मध्ये मान अडकलेल्या स्थितीत निपचित पडला असल्याचे त्यांना दिसून आले असल्याचे दिलेल्या खबरेत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *