👁 5 Views

पंढरपूरच्या संतोष अधटराव खुन प्रकरणी एका महिलेसह चौघेजण पोलिसांच्या ताब्यात..! अनैतिक संबंधातून झाला खुन… मित्रानेच केला घात..!

पंढरपूरच्या संतोष अधटराव खुन प्रकरणी एका महिलेसह चौघेजण पोलिसांच्या ताब्यात..!
अनैतिक संबंधातून झाला खुन… मित्रानेच केला घात..!
पंढरपूर Live 27 October 2017


मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगाव शिवारात झालेल्या पंढरीतील संतोष अधटराव यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश असून हा खून अनैतिक संबंधातून  झाला असून मित्रानेच घात केला असल्याचे तपासातून पुढे आले आहे. याप्रकरणी गुरुवारी मृत संतोष अधटराव याच्या खुन्यास ताब्यात घेण्यात आले असून आज त्याला अटक दाखवण्यात येणार आहे. 
 खुनाची घटना समोर आल्यानंतर बुधवारी रात्रभर मोहोळ व पंढरपूर परिसरात पोलिसांनी कसून चौकशी केली. गुरुवारी सकाळी एका महिलेसह ४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे पोलिसांनी खुन प्रकरणाची चौकशी केली. यात संतोषचा खून अनैतिक संबंधातून आपणच केल्याची कबुली एकाने दिली. तो संतोषचा मित्रच असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 
पोलिसांनी या माहितीच्या आधारे खुनासाठी वापरलेली गाडी, तसेच इतर साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आज त्याला अटक दाखविण्यात येणार आहे. 
त्यानंतर दोन दिवसांच्या आत खुन्यांचा तपास मोहोळ पोलिसांनी लावला. त्यामुळे मोहोळ पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्‍के आणि त्यांच्या टीमचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्‍पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह डोंगरे यांनीही टीमचे विशेष कौतुक केले आहे.
___________________________
खुन प्रकरणाची पार्श्वभूमी..
बुधवार दि. २५ ऑक्‍टोबर रोजी मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगाव शिवारात संतोष अधटराव यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आले. यानंतर मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र म्‍हस्‍के यांनी सहकार्‍यांसह घटनास्‍थळी दाखल झाले. मृतदेहावर धारदार शस्‍त्राने वार केले होते. शिवाजी थोरात यांच्या शेताजवळील टाकळी सिकंदर ते सय्‍यद वरवडे जाणार्‍या उजनी कॅनॉलच्याकडेला एका सिमेंटच्या पाईपमध्ये मृतदेह होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ओळख पटविण्याचे प्रयत्‍न सुरू केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळ येथील सरकारी रुग्‍णालयात पाठवण्यात आला. मृताच्या शरिरावर जागोजागी धारदार शस्‍त्राने वार करण्यात आले होते. अंगात पांढर्‍या रंगाचा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्‍स पँट होती. मात्र, चेहरा रक्‍ताने माखल्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले होते. मात्र, मृताच्या उजव्या हातावर संतोष ओम श्रीराम असे गोंदल्याचे पोलिसांना आढळले. दि. २६ रोजी मृताची ओळख पटली. सदर मृतदेह पुंडलिक मंदिर समितीचे सदस्य  संतोष चंद्रकांत अधटराव यांचा असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांनी मृतदेह संतोष यांचाच असल्याची खात्री केली. संतोष अधटराव हे भिसी चालवत असत. तसंत त्यांचा रिअल इस्टेट चाही व्यवसाय होता. हा खुन पैशाच्या देवाण घेवाणीच्या व्यवहारातून झाला की आणखी कोणत्या कारणाने? याचा तपास करण्याचे खुप मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु पोलिसांनी शिताफीने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. 
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  

  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर


 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *