पंढरपूर Live 27 October 2017
भाळवणी येथील 220 केव्ही उपकेंद्राचे
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
पंढरपूर दि.27: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे उभारण्यात आलेल्या 220 केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले.
भाळवणी येथील 220 केव्ही उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार भारत भालके, कल्याणराव काळे, शहाजी पवार, महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के, अधिक्षक अभियंता अरुण वाघमारे, जयंत कुलकर्णी, सतीश गायकवाड, श्रीमती शिल्पा कुंभार यांच्यासह महापारेषणचे अन्य अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भाळवणी येथे उभारण्यात आलेल्या उपकेंद्रातून 33 केव्हीचे 8 फिडर्स काढण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर तालुक्यातील वाखरी, विठ्ठलवाडी, भंडीशेगाव, पिराची कुरोली, धसूर, भाळवणी, खळवे व पळशी या ठिकाणी महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रांना विद्युतपुरवठा करण्यात येणार आहे. भाळवणी येथील 220 केव्ही उपकेंद्रामुळे परिसरात योग्य दाबाने सुरळीत विद्युत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




