पंढरपूर Live 26 October 2017
मंदीर परिसरात नारळ विक्रीस
वारीच्या कालावधीमध्ये मनाई
सोलापूर दि. 26 :- पंढरपूर येथे कार्तिकीवारी कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नारळ विक्री तसेच नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये सदर मनाई आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर येथे दिनांक 25 ऑक्टोबर 2017 ते 4 नोव्हेंबर 2017 या कालावधीत कार्तिकवारी यात्रा भरणार आहे. कार्तिकवारी कालावधीत नामदेव पायरी येथे व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात वारकरी भाविकाकडून नारळ फोडल्याने या ठिकाणी नारळाचे पाण्याने चिखल होऊन भावीक घसरुन पडण्याची शक्यता आहे. तसेच नारळाचे साली काढून टाकल्यावर घाण होते. नारळाच्या सालीमुळे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंदिर परिसरात नारळ विक्री करण्यास तसेच नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




