पंढरपूर Live 27 October 2017
सरदार पटेल यांच्या जयंती दिनी
सोलापुरात एकता दौडचे आयोजन
सोलापूर दि. 27 :- दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी याच्या पुण्यतिथी दिनी, 31 ऑक्टोबर रोजी संकल्प दिन पाळला जाणार आहे. त्याचबरोबर सरदार पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त त्याचदिवशी राष्ट्रीय एकता दिन पाळला जाणार असून त्यादिवशी सकाळी एकता दौडचे आयोजन केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत एकता दौड आणि संकल्प दिनाच्या कार्यक्रमाबाबतचे नियोजनावर चर्चा झाली. एकता दौडीचे सकाळी आठ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नियोजन केले जाणार आहे. यामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होतील. या दिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयात सकाही अकरा वाजता संकल्प दिनानिमित्त शपथ घेतली जाईल.
सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत पार्क स्टेडियमपासून पोलीस मुख्यालयापर्यंत संचलन केले जाईल. यामध्ये एन सी सी, एन एस एस, स्काऊट गाईड आदीही सहभागी होणार आहेत. या दिवसभराच्या कार्यक्रमात महानगरपालिका, जिल्हा परिषद, उच्च शिक्षण विभाग, सोलापूर विद्यापीठ आदी सहभागी होणार आहेत. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक, कार्यकारी अभियंता विलास मोरे आदी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



