👁 6 Views

धक्कादायक: पत्नीच्या 24 वर्षीय प्रियकराला घरी बोलावून जागीच संपवलं , 20 तूकडे करून फेकलं झुडपात

 

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

इथे एका पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाचे 20 तुकडे करून हे तुकडे चार गोण्यांमध्ये भरून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या कालव्याच्या काठावरील झुडपात फेकून दिले. याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी या हत्येचा खुलासा करून आरोपीला अटक केली आहे.


रिक्षाचालक मिलाल (34) याने पोलीस कोठडीत गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, आरोपीला आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याचा पश्चात्ताप नाही. खरं तर ही घटना गाझियाबाद जिल्ह्यातील लोधी चौकातील आहे. आरोपी मिलालने 19-20 जानेवारीच्या मध्यरात्री पत्नी पूनमचा प्रियकर अक्षय (24) याची हत्या केली. अक्षय हा मूळचा राजस्थानमधील कोटपुतली येथील आहे. माहितीनुसार, अक्षय एक वर्षापूर्वी खोडा येथे राहत होता आणि रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचा.


यादरम्यान तो मिलालच्या घरी जाऊ लागला आणि त्याने मिलालची पत्नी पूनमशी जवळीक साधली. मिलालने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याची 7 वर्षांची मुलगी रेखा हिला घरातच जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीच्या पत्नीला रोज मुलीकडे जावे लागत होते, तर पती रिक्शा चालवायला जायचा. त्यामुळे पत्नी पूनमला घरात असलेल्या 2 मुली आणि एका मुलाची सतत काळजी वाटायची.


पत्नीची काळजी पाहूनच आरोपी पतीने कट रचला आणि काही दिवसांसाठी अक्षयला राजस्थानमधून बोलवायला पत्नीला सांगितले. पत्नीने अक्षयला बोलावले आणि 19 जानेवारीला तो गाझियाबादला पोहोचला. चौकशीदरम्यान आरोपी मिलालने सांगितले की, त्याने कट रचून सर्व तयारी केली होती आणि पूनमला तिच्या मुलीकडे रुग्णालयात जाण्यास सांगितले. पूनम निघून गेल्यानंतर मिलालने अक्षयच्या खोलीत पोहोचून त्याच्या मानेवर जोरदार वार केले. या हल्ल्यात 24 वर्षीय अक्षयचा जागीच मृत्यू झाला.



आरोपी मिलालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने अक्षयवर वार करून त्याची हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहाचे 20 हून अधिक तुकडे केले. तसेच त्याने याबाबत मुलांनाही काहीच कळू दिले नाही आणि सकाळी मुले उठली तेव्हा त्यांना सांगितले की काका रात्रीच घरी परतले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *